लाल बहादुर शास्त्री


 लाल बहादुर शास्त्री कॉंग्रेस चे सरचिटणीस असताना त्यांना दरमहा ६० रुपये  पगार होता , जो ते आपल्या पत्नी कडे देत आणि त्या मध्ये त्यांचा सगळा खर्च चालत असे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या कडे आला , त्याच्या मुलाच्या शस्त्रक्रिये साठी त्याला ६० रुपये उसने पहिले होते, त्यांनी शास्त्रीजींकडे ६० रुपये मागितले..., शास्त्रीजी म्हणाले कि माझा पगाराच तेव्हडा आहे, ज्या मध्ये माझ्या कुटुंबाचा खर्च जम्तेम भागतो मी तुला कुठून पैसे देऊ ? शास्त्रीजींची पत्नी हे ऐकत होती , त्या म्हणाल्या त्याची आजची गरज महत्वाची आहे , माझ्या कडे ६० रुपये आहेत आपण ते त्यांना द्या. शास्त्रीजींनी त्याला पैसे दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला विचारले कि हे पैसे तू कुठून आणलेस ? त्या म्हणाल्या तुमच्या दर महिन्यातील पगारातून मी ५ रुपये साठवत होते त्याचे १ वर्षाचे असे साठलेले , ६० रुपये माझ्या कडे होते.   ...त्या नंतर लाल बह्हादूर शास्त्री यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि स्वतःचा पगार ५५ रुपये करण्याची विनंती केली....त्यांनी असे लिहिले कि माझा  महिन्याचा खर्च ५५ रुपयात भागतो......!!!. 

मरताना अवघे "६ आणे" खिशात असणारा ....... भारतीय पंतप्रधान स्वर्गिय लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती

उत्तुंग व्यक्तीमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी…

खाजगी कामासाठी १५ किलोमीटर सरकारच्या गाडीचा उपयोग झाला तेव्हा आपल्या पत्नीला त्या खर्चाची रक्कम सरकारी कोषात भरायला सांगणारे, दुष्काळात आठवड्यातून १ दिवस पुर्णतः भुखे राहणारे, पत्नीला फाटलेल्या शर्टापासून मला याचा रुमाल तयार करून दे म्हणणारे, शेतकरी आणि जवान हे खरे राष्ट्रनिर्माते असल्याचे ओळखून जय जवान जय किसान नारा देणारे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्ष जेल मध्ये राहणारे

उंचीने कमी मात्र कर्तुत्वाने श्रेष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या शास्त्रीजींच्या बाबतीत ‘मूर्ती छोटी, कीर्ती महान’ असेही कौतुकाने म्हटले जाई. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झालेल्या शास्त्रीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. राष्ट्राच्या दृष्टीकोनातून सैनिक आणि शेतकरी यांचे महत्व लक्षात घेता, दोघांच्याही सन्मानार्थ त्यांनी जारी केलेली ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा आजही लोकप्रिय ठरते.

लाल बहादूर शास्त्री .. थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री. लाल बहाद्दूर यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ राजी झाला. बालपण आणि संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने गेले. ९ जून १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.१९६५ च्या भारत-पाक युद्धात भारतीय जवानांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहत, त्यांनी राबविलेल्या मुत्सद्दी धोरणाच्या जोरावर पाकला चारी मुंड्या चित् करून भारतीय सैन्याने विजय मिळविला.आणि १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता.त्या आधी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही समर्थपणे पेलली होती. त्यांच्या कर्तबगारीवर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळविले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले. एका दुर्दैवी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. अशा प्रकारे राजीनामा देण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.

१९६५ च्या युद्धातील विजयानंतर सोविएत रशियाने मध्यस्ती केली आणि तत्कालीन सोविएत संघातील ताश्कंद येथे युद्धबंदी करण्यासाठी भारत-पाक शांतीचर्चा घडवून आणली. ह्याच दरम्यान ताश्कंद येथे हृदयविकाराचे एकामागोमाग दोन तीव्र झटके आल्याने ११ जानेवारी १९६६ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्या वेळी अवघे ६ आणे खिशात होते .स्वत:साठी काहीही न मागे ठेवता दौ-यावर असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. संपूर्ण जगाला त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले, परंतु त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री व मुलगा सुनील शास्त्री यांच्या मतानुसार लाल बहादूर शास्त्रीवर विषप्रयोग झाला होता. यासाठी त्यांच्या स्वयंपाक्याला अटक करण्यात आली परंतु नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. ताश्कंद करावर सही कारण लाल बहादूर शास्त्रीना मान्य नव्हत पण त्यांना मजबुरीने त्यावर सही करावी लागली व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सदर बाबतीचा धक्का घेतल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा. आजपर्यंत भारत सरकार ने सुरक्षेचे कारण देऊन त्या घटनेचा अहवाल जगासमोर आणलेला नाही.

असे हे उत्तुंग व्यक्तीमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी…. देशाचे पंतप्रधान असूनही कोणतीही संपत्ति त्यांच्या नावावर जमा नव्हती उलट कर्जच काढून ते घर चालवत. "जय जवान, जय किसान" असा अनोखा नारा देत त्यांनी जवान आणि किसान हेच देशाचे भविष्य असल्याचे देशाला पटवून दिले होते जनतेला जिंकणारा भारतीय पंतप्रधान स्व लाल बहादूर शास्त्री हे एकच उदाहरण आहे. राष्ट्राप्रती त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

*पूज्यनीय स्वातंत्र्य सेनानी माजी पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्रीजींच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

* *जय जवान,जय किसान*

भारतमातेच्या ह्या थोर सुपुत्रास कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

                                                                                                              आज २ ऑक्टोबर  लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती..त्यांना विनम्र अभिवादन...!

No comments: