मुलांना शिस्त कशी लावायची

  मुलांना शिस्त कशी लावायची कदाचित आपल्या आधीच्या पिढीला हा प्रश्न कधीच पडला नसावा. पण पालक आणि मुलं हे समीकरण पिढ्यानपिढ्या सारखच राहत. पण आपल्या पिढीला हा प्रश्न पडतो कारण आपल्या पिढीमध्ये बऱ्यापैकी  पालक हे कामावर जात असून,  तसेच एकत्र कुटुंब पद्धती आता दिसत नाही. मुलांना देण्याचा वेळ काही प्रमाणात कमी झालेला आहे. कधी कधी आपल्या कामामुळे इतके व्यस्त असतो की मुलं अचानक मोठी झाल्याचे भासत. अचानक प्रश्न पडतो मुलांना शिस्त कशी लावावी?

 मुलांना शिस्त ही त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती, त्यांचे पालक त्यांची शिक्षक आणि त्यांचे मित्र यांच्याकडूनच लागते. आपल्या प्रत्येक वागण्याचं आकलन करत असतात तसेच शाळेत त्यांना त्यांचे शिक्षक काय शिकवतात त्यांचे मित्र कसे वागतात याच्यावर ही त्यांची शिस्त बऱ्यापैकी अवलंबून असते. त्याची सगळ्यात जास्त जबाबदारी पालकांची असते.

 सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा मुलं आपल्याकडे काही विचार न करता केवळ काही बोलल्या करता येतात तेव्हा पालक म्हणून आपण त्यांना शंभर टक्के वेळ/ लक्ष देतो का.

 आपल्या हातात सतत आपला मोबाईल तसेच समोर लॅपटॉप  असतो का? ज्यामुळे मुलांना असा भास होतो की आपण जे काम करतोय ते फार महत्त्वाच आहे आणि किंबहुना ते मुलांपेक्षाही महत्त्वाच आहे अशी जाणीव झाल्यानंतर मुलं थोडेसे जिद्दी होऊ लागतात. त्याकरता गरजेच आहे ते जेव्हा मुलं आपल्याकडे काही हेतूने येतात तेव्हा मुलांना  शंभर टक्के लक्ष द्यावे, त्यांच्या मनातील ते महत्त्वाचं नाही अशी भावना एकदा गेली की मुलं आपोआप आई-वडिलांचे सगळं ऐकू लागतात. आई-वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं आवडतं इनफॅक्ट लक्ष वेधून घेण्या करता ते बरंच काही करतात कधीकधी चुकाही करतात.

 जर आपण लहान मुलांविषयी बोललो तर लहान मुलांना फक्त आई-वडील समोर हवे असतात आई-वडिलांनी आपल्या  बरोबर बोलावं खेळावं एवढीच अपेक्षा असते त्यांना आई-वडिलांकडून मटेरियलस्टिक अशी काहीही अपेक्षा नसते. त्यामुळे रोज कामावरुन आल्यानंतर आपला सगळं कामाचं व्याप बाजूला ठेवून आपण मुलांना कमीत कमी अर्धा ते एक तास दिला तर मुलं अतिशय खूश होऊन नीट वागतात.

 दिवसातल एक  जेवण तरी मुलांबरोबर करणं आवश्यक असतं. तसेच जेवताना मोबाइल किंवा काम बाजूला ठेवणे,फोन न उचलणे, आणि कुटुंबाबरोबर बोलत बोलत गप्पा मारत जेवण   केल्यानं मुलांना त्यांना वेळ दिल्यासारखं वाटतं.

 मुलांशी आपल्याला काही शंका विचारतात तेव्हा बराच वेळा आपल्याला त्याचे उत्तर माहीत नसतात तेव्हा मुलांना सरळपणे माहित नाही असं म्हणण्यापेक्षा विचार करतो आणि माहिती करून सांगतो हे जास्त सोयीस्कर असं केल्याने आपण मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करतो किंवा प्रोत्साहन देतो

महत्त्वाचा मुद्दा - मुलांमध्ये आणि आई-वडिलांमध्ये कम्युनिकेशन विचारांची देवाण-घेवाण खूप  गरजेची आहे.

 आपले विचार मुलांना कळायला हवेत तसेच मुलांचे विचार सुद्धा आई-वडिलांनी गृहीत धरायला हवेत घरातला कुठलाही निर्णय घेताना त्यामध्ये मुलांचा विचार घेऊन ती गोष्ट केली तर मुलांना जबाबदार असल्यासारखं वाटतं. ते विचार करू लागतात थोडक्यात आपण  त्यांना डिसिजन मेकिंग शिकवतो यांन मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो.

 कम्युनिकेशन वाढवा कॉन्फिडन्स वाढला मुलं  निर्णय घ्यायला लागले म्हणजे त्यांच्यामध्ये आपोआप जबाबदारी येते.

 मुलं जबाबदारीने गोष्टी करायला शिकतात.

 मुले प्रत्येक गोष्ट आपलीच बघून करतात त्यामुळे आईवडिलांनी तर रोल मॉडेल होण्याकरता आपणही शिस्तशीर वागलो तर मुलं आपल्या सारखेच  वागतात.

 मुलांना शिस्त लावण्याकरता आईवडिलांनी स्वतः शिस्तशीर वागणं बोलणं आणि राहण तितकाच गरजेच आहे.

 मुलांना शिस्त लावण्याकरता महत्त्वाचा वाटा असतो  आजी आजोबांचा. आपले आई-वडील आपल्या मोठ्यांशी कसे वागतात किंवा आपल्या घरातील मोठे त्यांच्या मुलांशी कसे वागतात हे सगळं बघून शिकतात त्यांना वळण लागतं.

 घरातल्या लोकांच्या संस्कारावर मुलाचे संस्कार जास्त अवलंबून असतात तसेच त्यांच्या शाळेतील त्यांचे मित्र त्यांचा शिक्षक वर्ग त्यांना मार्गदर्शन करू शकतो.

 तुम्हाला तुमच्या मुलांना जे काय शिकायचं आहे समजा तुम्हाला एखादी भाषा शिकवायची असेल त्या भाषेमध्ये तुम्हाला बोलता लिहिता वाचता आले पाहिजे तर बोला तुमचं अनुकरण करतात तुमच्याकडून शिकतात.

 आपल्या आधीच्या पिढीपेक्षा आपल्याला मुलांना शिस्त लावून आहे थोडं चॅलेंजिंग वाटतं कारण तेव्हाच्या आणि आताच्या कुटुंब पद्धतीमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये  खूप फरक आहे आधी मुलांना आपोआप शिस्त लागायचे आणि थोड्याच शिकवावे लागायचं आता मुलांना जास्त शिकवावं लागतं.



No comments: