अनंतचतुर्दशी


उद्या अनंतचतुर्दशी 

आपला गणपती बाप्पा जाणार यावर्षीचा गणेशोत्सव दरवर्षीपेक्षा थोडासा वेगळा होता. उत्साह तोच होता,तीच रांगोळी,तेच हार फुले दुर्वा, तीच आरती आणि तोच  जय जय कार पण या साऱ्या बरोबर होतं ते एक अनामिक भय.

तसं अनामिक म्हणता येणार नाही कारण आपल्याला त्याचं नाव माहितीये - करोना. हे दहा दिवस गणपती आपल्या घरी येतो घरात एक वेगळीच  चहल पहल असते, सारे कुटुंबीय एकत्र येतात. अजूनही काही घरांमध्ये, मोठ्या घरात गणपती बसतो त्यामुळे जावा नंदा आजी-आजोबा सगळे एकत्र येतात.

यावर्षीचा गणेशोत्सव थोडासा सुनासुना गेला. कोणालाही घरी दर्शनाकरता बोलावता नाही आल, आणि कोणाच्याही घरी जातानाही आलं सोसायटीच्या गणपतीचे मंडळात सुद्धा शुकशुकाट होता. ओळखीचे चेहरे सुद्धा मास्क मागे लपलेले होते. सोसायटीचा गणेशोत्सव सुधा घरगुती पद्धतीने साजरा झाला यावर्षी. पण गणपती बाप्पा मात्र ऑन ड्युटी आहे तो त्याच्या वेळेवर आला आणि मला खात्री आहे प्रत्येकाने त्याला एकच मागणं मागितलं असणारे. एकच साकडे घातले असणारे

 सोसायटीच्या गणपतीचे विसर्जन सोसायटीच्या आवारामध्ये झाले यावर्षी त्याच्यामुळे काही धामधूम नाही काही सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत काळी लगबग नाही. सगळे अगदी शांत होते मध्ये आणि एका हाताच्या अंतरावरच करण्यात आलं सोशल डिस्टंसिंग.

 पण गणपती बाप्पाचा येण्यानं कुठेतरी करोना चा विसर पडला. हार फुले दुर्वा आणि कापुराच्या सुवासा मध्ये हा करोना नष्ट झाला असावा का ?
वातावरण मंगलमय झाले, आणि गणपती बाप्पा निघाले सुद्धा.

तिकडे दुसरीकडे माझ्या मुलींन गणपती बाप्पा बरोबर पूर्ण दहा दिवस गप्पा  मारल्या. तिच्या हट्टाखातर यावर्षी आम्ही बालगणेश आणला. आज त्याला हात जोडून प्रार्थना करत होती तू जाऊ नकोस मी तुला माझी सगळी खेळणी देते इकडेच राहा माझ्याकडे.

यावर्षी एक गोष्ट मात्र निदर्शनास आली ती म्हणजे मूर्तिकारांच्या मनातील भय कुठेतरी गणपतीचे चेहऱ्यावर दिसत होतं. गणपती बाप्पाला सुद्धा काळजी वाटत होती, त्याच्या डोळ्यांमध्ये एक काळजीचे सावट दिसत होतं.  जणू तोही म्हणत होता की हे मनुष्यI काय करून  बसला आहेस तू. मला वाटत होतं या जगात निर्माण केलेल्या  प्राण्यांमध्ये तू सगळ्यात हुशार प्राणी आहेस. पण  तुझ्या हुशारीचा अतिरेक झाला आणि तु तुझ्याच विरोधी वापरली.
आलेल्या अनुभवातून शहाणा हो ,तुझ्या चुका सुधार. प्रदूषण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कर. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नकोस. नाहीतर पुन्हा एकदा निसर्गाला पुढे येऊन स्वतः स्वतःची काळजी घ्यावी लागेल, आणि तुला मात्र घरात बसावं लागेल.
यावर्षी नसेल जमलं तर पुढच्या वर्षी माझे मातीची मूर्ती आण आणि तिचं घरीच विसर्जन कर.
 सगळ्यात बुद्धिमान आणि हुशार म्हणून तू राजा आहेस जगाचा बाकी प्राण्यांची काळजी घे. निसर्गाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू नकोस.

चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असूनही गणपती बाप्पाला त्याच्या अहंकार नाहीये पण मनुष्य मात्र त्यातल्या कला अवगत करून, पृथ्वीवर राज्य करू इच्छितो, निसर्गावर राज्य करू इच्छितो. जेवढा निसर्गावर आपला हक्क आहे तेवढाच बाकी प्राण्यांचा सुद्धा आहे. त्यांना जगु द्या नाहितर पुन्हा एकदा आपण घराचा पिंजरा धडकणार आणि ते मात्र मुक्त बाहेर फिरणार.
आपल्या पिढीला हा अनुभव आला तो आपल्या पुढच्या पिढ्यांना येऊ नये हीच गणेश चरणी प्रार्थना. पुढच्या वर्षी हा सण आपण  उत्साहात जल्लोषात साजरा करूयात.

 जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा 
आम्ही नमितो तव चरणा 
 वारुनिया विघ्ने 
देवा रक्षावे दिन हो



 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

संकल्प

आपण अनेकदा पूजेच्यावेळी प्रामुख्याने गणपतीत कापसाचे पवते (वस्त्र) घालतो. पूजेनंतर ते निर्माल्यात टाकतो. असे न करता हे वस्त्र तुमच्या घरा जवळील झाडाला,  गॅलरीत ( ते भिजणार नाही याची काळजी घेत) अडकवून ठेवा.
 या वस्त्रांचा कापूस,  पक्षी घरटे बांधताना घेऊन जातात. आपले घरटे मऊशार आणि उबदार करतात. असा प्रयोग  माझ्या मित्रांनी केला आहे. निसर्गाने दिलेले निसर्गालाच परत करायचे. पक्षी तुम्हाला  निश्चितच धन्यवाद देतील, अशी मला खात्री आहे.








3 comments:

Atul Doshi said...

खूप छान !!

Atul Doshi said...

खूप छान !!

Unknown said...

खुप छान blog अन् संदेश सुध्दा.