आजचा विषय आहे माझं पुस्तक एव्हाना तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की मी एक पुस्तक प्रकाशित केलं आहे.
करोना काळामध्ये सर्वोत्तम उपाय होता तो ई बुक्स चा कारण लॉक डाऊन मुळे लोकं वस्तूंना हात लावायला वस्तू मागवायला घाबरत होते. मग विचार केला की चला इ बुक पब्लिष करुयात ,कारण लोकं डाऊन मुळे मोबाईलचा जास्त उपयोग करत आहेत .त्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही ई-बुक वाचण्यात.
आता पुस्तकाबद्दल बोलूयात पुस्तकाचं नाव ओ वुमनिया. नावावरूनच अंदाज येतो याचा विषय स्त्री हा असावा. पण याचा विषय स्त्री नसून स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पे आणि तिला आलेले त्यातले अनुभव असा आहे.
आता हे अनुभव म्हणजे सगळे अनुभव, यात चांगले आणि वाईट. तिनं तिच्या आयुष्यात बजावलेल्या वेगवेगळ्या भूमिका जसे की आई बहीण मुलगी मैत्रीण, व्यवसाय करणारी स्त्री आणि तिची तारेवरची कसरत आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे नमूद केलेले अनुभव हे खरे असून तुमच्या माझ्या आयुष्यात घडले आहेत. पण पुस्तकात मांडताना ते एका वेगळ्या पद्धतीने मांडले गेले त्याच्यामुळे आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो.
गरीब असो वा श्रीमंत हुशार असो वा मठ्ठ व्यावसायिक असो किंवा घरी बसणारी आई असो एका पातळीवर आल्यानंतर आपण सगळे सारख्याच असतो मग अगदी एखाद्या व्यावसायिक असो किंवा घरामध्ये धुणीभांडी करणारी बाई असो तिच्या मनात येणारी ती अपराधाची भावना सारखेच असते.
कुठल्याही स्त्रीचा आयुष्य तिच्या आई-वडिलांशिवाय तिच्या नवऱ्या शिवाय, मुलांशिवाय भावा बहिणी शिवाय अपूर्ण असतं. म्हणून या पुस्तकामध्ये तिच्या कर्तुत्वान नवरा,कायम पाठीशी उभे राहणारे वडील आई कुठे काय करते असा म्हणणारी मुलं आणि एकमेकांची समजूत काढणाऱ्या मैत्रिणी सगळ्यांचा उल्लेख आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कुठेही स्त्री ही अबला आहे अशी भावना न येता आयुष्य कसं मजेशीर जगते याचा अनुभव येतो.
या पुस्तकामध्ये जिथे आपण आजच्या तारेवरची कसरत करणाऱ्या व्यवसायिक महिलेची गोष्ट वाचतो तिथेच आपण काही ऐतिहासिक चारित्र्यावर सुद्धा चर्चा करतो. आपण तिच्या आईपणा विषयी बोलतो तिच्या कर्तृत्वाविषयी बोलतो, तिला अनाहुतपणे येणाऱ्या अपराधी भावनेने बद्दल बोलतो.
महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकात चर्चा केलेल्या विषयामुळे फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही स्त्रीच्या मनाचा थोडासा अंदाज घेता येईल. कुठेतरी जेव्हा ती नाही म्हणते त्याचा अर्थ हो कसा असतो हे कदाचित पुरुषांना कळायला मदत होईल.

No comments:
Post a Comment